narayan rane in ratnagiri

महाड(Mahad) येथे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी शिवसेनेच्या तक्रारीवरून राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात महाड येथे दाखल गुन्ह्यात राणे यांना संगमेश्वर (Sangmeshwar)येथून २४ ऑगस्ट रोजी अटक करून त्याच दिवशी महाड येथील न्यायालयात सशर्त जामीन मंजूर झाला होता.

    अलिबाग : भाजपचे केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी जन आशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad Yatra) दरम्यान मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने झालल्या अटकेच्या कारवाईनंतर त्यांची सशर्त जामीनावर सुटका झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने राणे यांचा जबाब रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात नोंदविण्यासाठी राणे (Narayan Rane In Alibaug)यांनी हजेरी लावली.

    महाड येथे नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी शिवसेनेच्या तक्रारीवरून राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात महाड येथे दाखल गुन्ह्यात राणे यांना संगमेश्वर येथून २४ ऑगस्ट रोजी अटक करून त्याच दिवशी महाड येथील न्यायालयात सशर्त जामीन मंजूर झाला होता. त्यावेळी महिन्यातून दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजर राहण्यास न्यायालयाने फर्मावले होते.मात्र मागील वेळेस राणे हे प्रकृतीच्या कारणास्तव पोलीस अधीक्षकांसमोर हजर राहीले नव्हते मात्र आज त्यांनी हजर राहून जबाब नोंदविला. राणे यांचे वकील संग्राम देसाई सकाळीच जुहू येथे राणेंच्या निवासस्थानी पोहचले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली. त्यानुसार राणे दुपारी १ च्या सुमारास अलिबाग येथे रायगड पोलीस अधीक्षकांसमक्ष हजर राहून राणे यांनी जबाब नोंदवला आहे.

    अलिबागमध्ये काय म्हणाले राणे ?
    रायगड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावून बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले. हजर वगैरे झालो नाही, तर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आलो आहे, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.