नात्याला काळिमा फासणारी घटना, पुतण्याने वडिल आणि आत्यासमोरच काकावर धारदार शस्त्राने केले वार

पुतण्याने आपल्या सख्ख्या काकाची हत्या (Nephew Killed His Uncle) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पुतण्याने धारदार शस्त्राने काकावर सपासप वार केल्याने अतिरक्तस्रावामुळे काकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    पनवेल : जमिनीच्या वादातून(Land Dispute) पुतण्याने आपल्या सख्ख्या काकाची हत्या (Nephew Killed His Uncle) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad District)पनवेल तालुक्यात(Panvel Crime) घोट गावात हा प्रकार घडला. पुतण्याने धारदार शस्त्राने काकावर सपासप वार केल्याने अतिरक्तस्रावामुळे काकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

    या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात(Taloja Police Station) मृत व्यक्तीच्या सख्ख्या भावासह एकूण तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल(Crime) करण्यात आला आहे. निवृत्ती पाटील असं मृत काकाचं नाव आहे. वडील आणि आत्याच्या समोरच तरुणाने काकावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे.

    रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील घोट येथील सुनंदा कोळेकर, त्यांचा भाऊ निवृत्ती पाटील आणि त्यांचा मुलगा निरंजन पाटील असे तिघे गावातील पिंपळपाडा येथील चाळीच्या मागच्या बाजूला बोअरवेलच्या पाईपलाईनचे काम करत होते. यावेळी मोठा भाऊ बाळाराम पाटील आणि त्याची दोन मुलं नितीन पाटील आणि मनोज पाटील तिथे आली.

    तिघा बापलेकांनी निवृत्ती पाटलांना बोअरवेलच्या पाईपलाईनचे काम करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला. यावेळी एका पुतण्याने निवृत्ती यांच्या डोक्यावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. वडील आणि आत्याच्या डोळ्यांदेखतच हा प्रकार घडला. अतिरक्तस्रावामुळे काकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.हत्ये प्रकरणी निवृत्ती पाटील यांचा सख्खा मोठा भाऊ बाळाराम बाबू पाटील, त्यांचा मुलगा नितीन बाळाराम पाटील आणि मनोज बाळाराम पाटील या तिघा आरोपींच्या विरोधात तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.