नवीन पनवेल पोलीस चौकीजवळ अपघातात दुचाकीस्वार जखमी

पनवेल: नवीन पनवेल पोलीस चौकीजवळ भरधाव कारने दुचाकी स्वाराला १ मे रोजी उडवल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे

पनवेल: नवीन पनवेल पोलीस चौकीजवळ भरधाव कारने दुचाकी स्वाराला १ मे रोजी उडवल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.  कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे देशात टाळेबंदी करण्यात आली असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना कामावर जाण्यासाठी आणि नागरिकांना औषधे किवा किराणा खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे  याचा फायदा घेऊन अनेक जण घराबाहेर पडत असताना दिसतात. आपल्या महागड्या गाड्या घेऊन शहरात  फेरफटका  मारत असतात   शुक्रवारी  कामगार दिनाच्या दिवशी सुकापूर कडून पनवेलकडे जाणाऱ्या एम एच ०८ ए  एन  ३९३१  इको स्पोर्ट या कारने एम एच ४६आर ३८०३ या  दुचाकी स्वराला जोरात धडक दिल्याने दुचाकी स्वार नितीन पाटील रा, साई सम्राट हॉटेल च्या मागे सुकापूर पनवेल  हे १० ते १५ मीटर लांब फेकल्या गेल्याने पायाला व डोक्याला दुखापत झाली. कार चालक  मिथिलेश महेश घोसळकर राहणार रत्नागिरी यांनी दुचाकी स्वाराला  उपचारासाठी दावाखान्यात  दाखल केले असून या अपघाताची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनाम केला. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.