पेण अत्याचार प्रकरण – उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, फास्टट्रॅक कोर्टात चालणार खटला

पेण येथील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार(pen rape case) करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला कठोर शासन होण्याकरिता हा खटला राज्य शासनाच्या वतीने फास्टट्रॅक कोर्टात(pen case in fast track court) चालवण्यात येणार असून सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ उज्वल निकम(ujjwal nikam) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पेण येथे दिली.

पेण: पेण येथील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार(pen rape case) करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला कठोर शासन होण्याकरिता हा खटला राज्य शासनाच्या वतीने फास्टट्रॅक कोर्टात(pen case in fast track court) चालवण्यात येणार असून सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ उज्वल निकम(ujjwal nikam) यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पेण येथे दिली.

शंभूराज देसाई यांनी पेण येथे पीडीत कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच त्यांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, उपतालुका प्रमुख संतोष पाटील यांच्यासह अधिकारी व पोलीसवर्ग उपस्थित होता.

यावेळी शंभूराज देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाच्या मनोधैर्य योजना व दक्षता समितीच्या माध्यमातून तातडीने मदत करण्यात येईल असे जाहीर केले. सदर पीडित कुटुंबीयांच्या झोपडीला दरवाजा नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने सदर कृत्य केल्याने या आदिवासी वाडीवरील आदिवासींना शासनाच्या वतीने घरकुल व इतर विविध योजनांचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देसाई यांनी सांगितले.

गृह विभागाच्यावतीने राज्यभरात गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांची रात्री व दिवसाची गस्त वाढवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पेण बंद १०० टक्के यशस्वी

चिमुकलीवर झालेल्या अन्याया विरोधात संतप्त झालेल्या पेणच्या जनतेनी एक दिवसाचा बंद पाळावा असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे समीर म्हात्रे, आदिवासी आदीम कातकरी संघटना व समस्त आदिवासी समाज यांच्यातर्फेे करण्यात आले होते त्यानुसार आज गुरुवार रोजी पेण १०० % बंद ठेवण्यात आले होते. पेणच्या नागरिकांनी हा आरोपी आदेश पाटील याला फाशी होण्याकरिता पेणच्या मुख्य रस्त्यांवरून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.