पोलादपूर नगरपंचायतीत प्रविण दरेकर नापास, भाजपला फक्त १ जागा; शिवसेनेचा एकतर्फी विजय

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. पोलादपूरात भाजप नेते व राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. पाली नगरपंचायतीवर भाजपने निवडणुकीपूर्वी मोर्चेबांधणी केली होती. या मोर्चे बाधणीत भाजपला पुर्णत: अपयश आलं आहे. या निवडणूकीत एकूण १७ जागांसाठी मतदान झाले. यात शिवसेनेला १० जागा राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे.

    ओबीसी आरक्षणावरून निवडणूक प्रक्रिया लांबलेल्या नगरपंचायतींचा निकाल आज बुधवारी जाहिर झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम ठरणार आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. पोलादपूरात भाजप नेते व राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

    पाली नगरपंचायतीवर भाजपने निवडणुकीपूर्वी मोर्चेबांधणी केली होती. या मोर्चे बाधणीत भाजपला पुर्णत: अपयश आलं आहे. या निवडणूकीत एकूण १७ जागांसाठी मतदान झाले. यात शिवसेनेला १० जागा राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा तर भाजपला केवळ १ जागा मिळाली आहे.

    नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो – प्रवीण दरेकर

    पोलादपूर नगरपंचायत द्या, मी तुम्हाला देखणं शहर देतो असे आश्वासन भाजपा नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले. नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची सांगता रविवारी प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली काढून झाली.

    पहिल्या टप्प्यातील निवडणूकीमध्ये जनतेने आशिर्वाद दिला आहे. दुसर्‍या टप्प्यातही जनता कौल देईल असा मला ठाम विश्वास वाटतो. कारण पोलादपूरकरांसाठी भारतीय जनता पक्षा ची पाटी कोरी आहे. यापूर्वी पोलादपूरवासियांनी शिवसेनेला संधी देऊन बघितली. मात्र शहरभर फेरफटका मारलात तर कोठेही अभिमान वाटेल असे मूलभूत काम, सोयीसुविधा दिसून येत नाहीत. असं दरेकर यांनी म्हटलं होतं.