राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज रायगड दौऱ्यावर, महाराजांना करणार अभिवादन

राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर पाचाड आणि रायगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तासह, एसपीजी कमांडोजही तैनात करण्यात आले आहेत. अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो, राज्य राखीव दल, शिघ्र कृती दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजता राष्ट्रपती हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल होणार आहे. तेथून रोपवेने ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत.

    रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यासाठी आज स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर येत आहेत. तब्बल 35 वर्षांनी भारताचे राष्ट्रपती किल्ले रायगडावर येत आहेत.

    या भेटीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिवप्रेमींच्या भावनेचा सन्मान करत रोप वेनं रायगडावर पोहोचणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापूर्वी ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना रायगडावर आले होते. तर, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील स्वराज्याच्या राजधानीला भेट दिली होती. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं आहे.

    राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर पाचाड आणि रायगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तासह, एसपीजी कमांडोजही तैनात करण्यात आले आहेत.

    अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो, राज्य राखीव दल, शिघ्र कृती दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजता राष्ट्रपती हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल होणार आहे. तेथून रोपवेने ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत.

    याआधी राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर थेट किल्ल्यावर उतविण्यासाठी होळीच्या माळावर नव्याने तात्पुरते हेलिपॅड उभारण्याचा विचार सुरू होता. मात्र विरोधाचा विचार करुन अखेर ‘रोप-वे’द्वारे राष्ट्रपतींनी यावे, असा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. राष्ट्रपती कार्यालयाने शिवाजी महाराजप्रेमींच्या भावनांचा विचार करुन ‘रोप-वे’द्वारे राष्ट्रपती किल्ले रायगड येथे येतील, असे कळवले आहे.