president ramnath kovind raigad visit

तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी राष्ट्रपती रायगडावर येण्याचा योग आला. यामुळे गडावर कडेकोट बंदोबस्त(Police Security On Raigad) ठेवण्यात आला होता. रायगडला(Raigad) भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद(President Ramnath Kovind Raigad Fort Visit) यांनी व्यक्त केले.

    महाड : रायगडला(Raigad) भेट देणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद(President Ramnath Kovind Raigad Fort Visit) यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, विसाव्या शतकात गांधीजीनी स्थापन केलेले हिंद स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानी सहकुटुंब उपस्थित राहात किल्ले रायगडावर महाराजांना अभिवादन केले. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी राष्ट्रपती रायगडावर येण्याचा योग आला. यामुळे गडावर कडेकोट बंदोबस्त(Police Security On Raigad) ठेवण्यात आला होता.

    रायगडावर आधारित माहितीपटाचे प्रकाशन
    राष्ट्रपती गडावर आल्यानंतर त्यांनी सहकुटुंब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रपती कोविंद हे नियोजित दौऱ्यानुसार दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत रायगडावर थांबणार होते मात्र गडावरच भोजन करून जवळपास चार वाजेपर्यंत गडावरच थांबले. रायगडावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी विशेष बग्गीची व्यवस्था निमंत्रकांनी केली होती. होळीचा माळ ते जगदीश्वर मंदिर या अंतरात या बग्गीचा वापर करण्यात आला.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी याठिकाणी आयोजित केलेल्या एका पुस्तक प्रदर्शनालादेखील भेट दिली. यावेळी त्यांनी दोन पुस्तकांचे प्रकाशनदेखील केले. रायगडावर आधारित माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

    समाधीस्थळाला भेट देत पुष्पहार अर्पण
    भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी किल्ले रायगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. त्यापूर्वी रामनाथ कोविंद यांचे दुपारी पाचाड येथे आगमन झाले. त्यानंतर ते रायगड रोप वे ने किल्ल्य्यावर गेले. किल्ले रायगडावर होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरण्यास शिवभक्तांनी विरोध दर्शवल्यानंतर हेलिकॉप्टर पाचाड येथे उतरवण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाचाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले. या ठिकाणाहून विशेष वाहनाने राष्ट्रपती रायगड रोपवेकडे गेले. रायगड रोपवे याठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, खासदार युवराज संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी राष्ट्रापती कोविंद यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींनी यावेळी राजसदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, आणि छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

    रायगड रस्ता सामसूम – प्रवासी वाहने नसल्याने ग्रामस्थांचे हाल
    राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार असल्याने पर्यटक बंदी करण्यात आली तर  रस्त्यावरील प्रवासी वाहने देखील रोखण्यात आली होती. यामुळे दैनंदिन कामासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. शिवाय परिसरातील खाजगी वाहने देखील बंद ठेवण्यात आल्याने विद्यालयीन विद्यार्थी देखील शाळेत येवू शकले नाहीत. तर एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या नागरिकांना चालतच ये जा करावी लागली. पाचाड मध्ये तर घरातून बाहेर पडण्यास मनाई केल्याने ग्रामस्थांना राष्ट्रपती कसे आहेत हे देखील पाहता आले नाही.