Ban on tourist sites lifted; Inconvenience to Shiva devotees as Raigad ropeway is closed

सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला ७ डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद(Raigad Fort To Remain Close For Tourists Till 7 December) ठेवण्यात आला आहे. रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविंद(Ramnath Kovind) हे ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर येत आहेत.

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद(Ramnath Kovind) हे ७ डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर(Raigad Fort) छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला ७ डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद(Raigad Fort To Remain Close For Tourists Till 7 December) ठेवण्यात आला आहे. रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

    दिनांक ३ डिसेंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणून या हेतूने दौऱ्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

    भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दिनांक ७ डिसेंबर (२०२१) रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना संभाजीराजेंनी राष्ट्रपती रायगडाला भेट देणार “ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे,” असं संभाजीराजे ट्विटरवरुन म्हणाले होते.