‘पर्यटकांनो, नववर्षाचे स्वागत करा पण ‘या’ गोष्टी विसरू नका’- रायगड पोलिसांचे आवाहन

 मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकासंह स्थानिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाचे नियम पाळूनच(rules related to corona) एन्जॉय करावे,असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस(raigad district police) अधिक्षक अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत(press conference) केले आहे.

अलिबाग :  मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकासंह स्थानिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाचे नियम पाळूनच(rules related to corona) एन्जॉय करावे,असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस(raigad district police) अधिक्षक अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत(press conference) केले आहे.

दुधे पुढे म्हणाले की, ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून, रायगड जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका न बसता, त्यांचा प्रवास सुखरुप व्हावा यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचे चेकपॉईंट असतील. या चेकपॉईंटच्या ठिकाणी पर्यटकांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी आरोग्य कर्मचारीही तैनात असतील. पण पर्यटकांची तपासणी करताना वाहतूक कोंडी होणार नाही याकडेही पोलिसांचे लक्ष असेल.

त्यांनी म्हटले की, पर्यटनस्थळी आणि धार्मिक स्थळी गर्दी होणार नाही याकडे सर्वानीच लक्ष देणे गरजेचे असून, जेथे विजेची सोय नाही अशा ठिकाणी विजेची सोय करण्यात येणार आहे. समाजकंटकांकडून महिला, मुली यांची छेड काढली जाणार नाही यासाठी ठिकठिकाणी महिला पोलीस तैनात असतील. याशिवाय या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल. जिल्ह्यात कोठेही कोठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नसून, मद्य पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्य़ासही प्रतिबंध असेल. विशेष करून रेव्हपार्टी करणाऱ्यांकडे पोलिसांचे विशेष लक्ष असेल. असे प्रकार पोलिसांच्या नजरेत आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मिरवणुका काढता येणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनीव दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षेच्या व आरोग्याच्या दृष्टीने घराबोहर पडू नये असे दुधे यांनी सांगतानाच रस्त्यावरून वेगाने वाहने नेणे तसेच सोसायटीच्या आवारात, गच्चीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास प्रतिबंध असेल. मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत आनंदाने करा, मात्र सोशल डिस्टटंट, तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कराय़ला विसरू नका असेही ते म्हणाले.