भविष्यात सेना, भाजप व आरपीआय महायुतीचे सरकार येणार : मंत्री रामदास आठवले

“जुन्या पुतळ्याला वर्ष झाली तीस, मग मी का करु ऊद्धाटनाचा कार्यक्रम मिस” अशा काव्यपंक्ती उच्चारत आठवले यांनी हसत हसत चिमटे काढले. “एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करता कामा नये, आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. मात्र, दुरावा निर्माण होऊ नये. प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालील मी एकटा गेलो, मंत्री झालो. आंबेडकरी बाकी नेते मागे राहिले.

    रायगड : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप व रिपाई एकत्रित आल्यास राजकिय दृष्ट्या मोठा फायदा होईल व सेना, भाजप रिपाइंचे सरकार येईल’ असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. मंत्री आठवले यांच्या हस्ते खोपोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    “जुन्या पुतळ्याला वर्ष झाली तीस, मग मी का करु ऊद्धाटनाचा कार्यक्रम मिस” अशा काव्यपंक्ती उच्चारत आठवले यांनी हसत हसत चिमटे काढले. “एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करता कामा नये, आपल्या पक्षाची भूमिका मांडली पाहिजे. मात्र, दुरावा निर्माण होऊ नये. प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालील मी एकटा गेलो, मंत्री झालो. आंबेडकरी बाकी नेते मागे राहिले.

    आठवले पुढे म्हणाले की, “खोपोलीची माणसं मला आवडतात. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या कार्यक्रमाला खोपोली मधून बसेस भरून आलेले खोपोलीकर आहेत. मी लोकसभा सभागृहात हसवता, हसवता कुणाला फसवतो हे त्यांना ही कळत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी भिम शक्ती शिव शक्ती एकत्र करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याचा मी खरा साक्षीदार आहे,  प्रबोधनकार ठाकरे व बाबासाहेब आंबेडकर मित्र होते. आपण ही मित्र असले पाहिजे.” असं देखील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.