राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे; अनंत गीते यांचं टीकास्त्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं म्हणत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

    रायगड : रायगड लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते हे राजकारणापासून दूर गेले होते. मात्र अनंत गीते आता पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यानं पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

    दरम्यान यातच आता अनंत गीते यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे.

    अनंत गीते नेमकं काय म्हणाले? 

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं म्हणत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस हे कधीच एक होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असं टीकास्त्र देखील अनंत गीते यांनी सोडलं आहे.

    दरम्यान, 2019 मध्ये अनंत गीते यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल होता. त्यानंतर अनंत गीते काही काळासाठी राजकारणातून अलिप्त होते. त्यानंतर आता अनंत गीते हे परत राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खलबतं होण्याची शक्यता वाढली आहे.