chavdar tale satyagrah din

कोरोना संसर्गाच्या(corona) पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेने महाडमध्ये येऊ नये, या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला राज्यभरातील जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळे मोजके नेते आणि स्थानिक आंबेडकरी जनतेनेच चवदार तळे(chavdar tale) येथे जाऊन महामानवाला अभिवादन केले.

    महाड: चवदार तळे सत्याग्रहाचा(chavdar tale satyagrah)चौऱ्याण्णववा वर्धापन दिन आज महाडमध्ये शांततेत साजरा करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या(corona) पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेने महाडमध्ये येऊ नये, या प्रशासनाने केलेल्या आवाहनाला राज्यभरातील जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळे मोजके नेते आणि स्थानिक आंबेडकरी जनतेनेच चवदार तळे येथे जाऊन महामानवाला अभिवादन केले.

    आज सकाळी महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, सभापती  सपना मालुसरे, नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यासह स्थानिक अधिकारी, पदाधिकारी यांनी बाबा साहेबाना चवदार तळे येथे अभिवादन केले.

    बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. तालुक्यातील मोजक्याच लोकांनी आज चवदार तळे येथे हजेरी लावली.