माथेरानमध्ये सेम CID च्या स्टोरी सारखी मर्डर; पर्यटक महिलेचा शिर गायब आणि निर्वस्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ

माथेरानमध्ये सेम CID च्या स्टोरी सारखी मर्डर झाली आहे. एका पर्यटक महिलेचा शिर गायब आणि निर्वस्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे(Woman killed in Matheran Tourist woman's head missing and body found naked ). रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

    नेरळ: माथेरानमध्ये सेम CID च्या स्टोरी सारखी मर्डर झाली आहे. एका पर्यटक महिलेचा शिर गायब आणि निर्वस्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे(Woman killed in Matheran Tourist woman’s head missing and body found naked ). रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

    सध्या थंडीचा मौसम सुरु झाल्याने माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे. अशातच येथे फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेचा मृतदेह रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. माथेरान रेल्वे स्थानकासमोरील बंद असलेल्या खोलीत मृतदेह आढळून आला आहे.

    महिलेचे शिर गायब आहे. तर या महिलेच्या अंगावर कपडे नव्हते. महिलेची हत्या करुन तिचे शिर धडा पासून वेगळे केले आहे. मृतदेहाच्या आसपास किंवा परिसरात कुठेही या महिलेची शिर सापडले नाही. तसेच मृतदेहाजवळ बॅग अथवा इतर कोण्याताही वस्तु सापडलेल्या नाहीत.

    पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दरम्यान, अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिस स्थानिकांकडे चौकशी करत आहेत.