नारायण राणेंवरील कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारला उठलेला पोटसुळ; विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागेल असे वाटण्याचे कारण नाही. राणे यांना महाड न्यायालयात नेल्या नंतर तेथील निकालानुसार राणे यांना जामीन मंजुर झाला आणि त्यांची प्रकृती ठिक असेल तर जन आर्शिवाद यात्रेस पुन्हा सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते दरेकर यांनी दिली.

    रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला उठलेला पोटसुळ ह्या कारवाईच्या माध्यमातून दिसून येतो अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी रत्नागिरी येथे दिली.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लागेल असे वाटण्याचे कारण नाही. राणे यांना महाड न्यायालयात नेल्या नंतर तेथील निकालानुसार राणे यांना जामीन मंजुर झाला आणि त्यांची प्रकृती ठिक असेल तर जन आर्शिवाद यात्रेस पुन्हा सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते दरेकर यांनी रत्नागिरी विश्रामगृह येथे प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दिली.

    मुंबईतून रत्नागिरी येथे तातडीने दाखल झालेले दरेकर म्हणाले की, कोणत्याही गुन्ह्याला घाबरणारा भाजप पक्षाचा कार्यकर्ता नाही. जन आर्शिवाद यात्रा ताकदीने सुरू असून यात्रेला लोकांचा भरभरून आर्शिवाद देखील मिळत आहे. आजची बेकायदेशीर कारवाई म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा राणे साहेबांना कुठे तरी अडकवण्याचा डाव आहे. त्यामुळे एकाच वेळेला तीन चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.

    महाड न्यायालायत राणे यांच्या बाजूने निकाल लागला तरी नाशिक मधील दाखल केलेल्या एफआयरनुसार त्यांना पुन्हा अटक करण्यात येईल अशी आपल्याला भीती वाटत असल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, ही सर्व बेकायदेशीर कारवाई पाहता सरकारच्या मनात किती पाप आहे हे यातुन दिसुन येते. सरकराने नियोजन करून केलेला हा कट आहे. तसेच उदया दुदैर्वाने राणे साहेबांच्या प्रकृतीला काही झालं तर याला महाविकास आघाडी सरकार आणि पोलिस प्रशासन जबाबदार राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]