तब्बल दीड वर्षानंतर रत्नागिरीतील मत्स्यालय पर्यटकंसाठी झाले खुले

झाडगाव येथील मत्स्यालयामध्ये विविध प्रकारचे मासे पहायला मिळत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या सहली भेटी देण्यासाठी येतात. दिड वर्षांपुर्वी हे संग्रहालय गर्दी टाळण्यासाठी बंद ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे मंदिरे, पर्यटनस्थळे गजबजू लागली आहेत. रत्नागिरीतही अनेक पर्यटक येऊ लागले असून मत्स्यालय बंद असल्यामुळे त्यांची निराशा होत आहे. ते सुरु करण्यासाठी कोकण कृषी विद्यापिठाला पत्रही सादर करण्यात आले होते.

    सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन कोरोनामुळे बंद ठेवलेले रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील प्रसिद्ध मत्स्यालय व संग्रहालय पर्यटकांकरीता खुले करण्यात आले आहे. गेले दिड वर्षे हे संग्रहालय बंद होते. दरवर्षी या ठिकाणी राज्याच्या कानाकोपर्‍यातून पावणेदोन लाख पर्यटक भेटी देत असतात.

    सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, डॉ. प्रकाश शिनगारे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक डॉ. आसिफ पागारकर यांनी तर मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. केतन चौधरी व  डॉ. सुरेश नाईक यांनी संशोधन केंद्र व मत्स्यालयाचा इतिहास सांगितला. संशोधन केंद्राचे आजवर केलेल्या संशोधन, विस्तार शिक्षण व मत्स्यालय सेवाकार्य चांगलेच आहे. या कार्याची प्रसिद्धी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.  तसेच डॉ. प्रकाश शिनगारे म्हणाले, सागरी संशोधन केंद्राला या पुढेही उत्तम कार्य करून केंद्राचे नाव लौकीकास नेण्याचे सर्व कर्मचा-यांना आवाहन केले.