प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ब्रिटनमध्ये कोरोनाची नवीन जीवघेणी प्रजाती आढळून आली आहे. यामुळे जवळपास संपूर्ण जगाने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. मात्र भारताने असे करण्यापूर्वीच ब्रिटनमधील १० प्रवासी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यामुळे संपूर्ण कोंकणातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक आरोग्य विभागही तातडीने कामाला लागला असून त्या १० प्रवाशांचा शोधशोध घेतल्या जात आहे.

रत्नागिरी (Ratnagiri).  ब्रिटनमध्ये कोरोनाची नवीन जीवघेणी प्रजाती आढळून आली आहे. यामुळे जवळपास संपूर्ण जगाने ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. मात्र भारताने असे करण्यापूर्वीच ब्रिटनमधील १० प्रवासी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यामुळे संपूर्ण कोंकणातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटनसारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक आरोग्य विभागही तातडीने कामाला लागला असून त्या १० प्रवाशांचा शोधशोध घेतल्या जात आहे.

ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने भारतातही गेल्या काही दिवसात ब्रिटनमधून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. ही शोधाशोध सुरू असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरुन 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील दहा दिवसांत हे दहा जण जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांच्या नावांची यादी आरोग्य यंत्रणेला विमानतळ प्रशासनाकडून मिळाली. तात्काळ या दहाही जणांचा शोध आरोग्य यंत्रणेने घेतला असून यापैकी 7 जण हे रत्नागिरी तालुक्यातील तर 3 जण संगमेश्वर तालुक्यातील असल्याचं आढळून आलं आहे.

चेन्नई, रायगडला रवाना
रत्नागिरी तालुक्यातील 7 जणांपैकी एकजण चेन्नईला तर दुसरा रायगडला गेला आहे. उरलेले पाच जण रत्नागिरी शहरातील असून सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची स्वॅब टेस्ट करून त्यांना एमआयडीसी येथे विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्यावरील उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. शिवाय हे दहाही जण गेल्या दहा दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याची यादी तयार करण्यात येत असून या नागरिकांच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, रत्नागिरीत लंडनहून आलेले दहाजण सापडल्याने कोकणातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.