कोकणात महा आघाडीत बिघाडी, विधान परिषदेच्या जागेवरुन वाद; दोन मोठे नेते आमनेसामने

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, खेड तालुक्यातील आंबडस येथील मेळाव्यात २०२४ मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत कुणबी समाजाला जागा मिळावी, अशी आपली मागणी असल्याचे म्हटले होते. यात कुणबी समाजाचा अपमान करण्याचा प्रश्नच नव्हता. कुणबी समाजाच्या मातृसंस्थेला राज्य सरकारने दिलेल्या ५ कोटी निधीचे समर्थन केले होते. आणखी मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला हवी म्हणताच तटकरेंना का झोंबले कळत नाही. खासदार तटकरे यांनी स्वतःसाठी, मुलग्यासाठी, पुतण्यासाठी विधानपरिषद मिळवली. घरात मुलगीसाठी मंत्रीपदही घेतले. त्यांना केवळ लोकांचे घेण्याची सवय आहे, देण्याची तर अजिबात नाही.

    चिपळूण : खासदार सुनील तटकरे यांनी स्वतःच्या कुटुबियांसाठी आणि स्वतःसाठी विधानपरिषदेची जागा घेतली. विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला मिळायला हवी म्हटंल्यावर त्यांना मिरच्या का झोंबल्या कळत नाही. तटकरेंनी खोट्या कंपन्या स्थापन करून सर्वसामान्यांच्या जमिनी बळकावल्या असल्याचे आरोप झाले आहेत. तटकरेंचे माझ्यावर कोणतेच उपकार नाहीत, उलट मीच त्यांना दिल्ली दाखवली आहे. त्यामुळे जाणीव नसलेल्या या महान नेत्याला काय मार्गदर्शन करणार अशी खोचक टीका आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    आमदार भास्कर जाधव म्हणाले की, खेड तालुक्यातील आंबडस येथील मेळाव्यात २०२४ मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत कुणबी समाजाला जागा मिळावी, अशी आपली मागणी असल्याचे म्हटले होते. यात कुणबी समाजाचा अपमान करण्याचा प्रश्नच नव्हता. कुणबी समाजाच्या मातृसंस्थेला राज्य सरकारने दिलेल्या ५ कोटी निधीचे समर्थन केले होते. आणखी मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला हवी म्हणताच तटकरेंना का झोंबले कळत नाही. खासदार तटकरे यांनी स्वतःसाठी, मुलग्यासाठी, पुतण्यासाठी विधानपरिषद मिळवली. घरात मुलगीसाठी मंत्रीपदही घेतले. त्यांना केवळ लोकांचे घेण्याची सवय आहे, देण्याची तर अजिबात नाही.

    आमदार जाधव पुढे म्हणाले की, नाव राष्ट्रवादी आणि स्वतःमात्र कुटुंबवादी. खासदारकी, मंत्रीपद, विधानपरिषद सगळं काही आपल्या कुटुबांतच ठेवायचे, ही त्यांची मनोवृत्ती आहे. उलट कुणबी समाजाला उमेदवारी देण्याचे टाळून त्यांनी या समाजाचा अपमान केला आहे. राजकारणात ज्यांनी ज्यांनी तटकरेंना सहकार्य केलं, त्यांची तटकरेंनी माती केली. केलेल्या उपकाराची त्यांना कसलीच जाणीव नाही. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हक्काची असलेली विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला मिळावी. ही भुमिका असल्याचे मतही आमदार जाधव यांनी व्यक्त केले.