राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढच्या 12 तासात अजून तीव्र होण्याची व 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच ह्यामुळे राज्यात पुढचे 4, 5 दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात (Maharashtra Rains) पावसाने थैमान घातलं आहे. परंतु राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान (IMD) खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील चार ते पास दिवस पुन्हा राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरण बदल (Climate change) असल्याने राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे.

    यंदाच्या वर्षी झालेल्या पावसामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी याठिकाणी अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढच्या 12 तासात अजून तीव्र होण्याची व 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच ह्यामुळे राज्यात पुढचे 4, 5 दिवस गडगडाटासहीत, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रविवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.