कोकणात कोरोना झापाट्याने परतोय, कोकण कृषी विद्यापीठाचे १० विद्यार्थी पॉझिटिव्ह; रत्नागिरी सिंधुदुर्गातील सर्व शाळा कॉलेज बंद

रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील शाळा आजपासून बंद होत आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंदचे आदेश दिले आहेत. पहिलीपासून ते बारावीपर्यतचे वर्ग बंद राहणार आहेत. रत्नागिरीमध्ये आता ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद, नागपूर जिल्ह्यातील शाळांबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे ५६ रूग्ण सक्रीय असून, आवश्यकता भासल्यास निर्बंध कडक करण्याचे सूतोवाच राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केले होते. त्याचवेळी जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी आकडेवारी समोर आली. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील सिंधुदुर्ग वसतिगृहात राहणारे १० विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.