रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला, जुलै महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

एप्रिल, मे, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात(Ratnagiri) कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट(Corona Patients Number Decreased) झाली आहे.

    रत्नागिरी: मार्च महिन्यात सुरु झालेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा(Corona Second Wave) प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात(Ratnagiri) ओसरु लागला आहे. एप्रिल, मे, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात(Ratnagiri) कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट(Corona Patients Number Decreased) झाली आहे. जुलै महिन्यात १८ दिवसांमध्ये ६ हजार ४९५ बाधितांची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या पंधरवड्यात हाच आकडा दहा हजाराच्या घरात होता.

    दुसऱ्या लाटेचे राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये थैमान असताना यामध्ये रत्नागिरी चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर पावणेसहा टक्केच्या दरम्यान आहे. आजारी, मधुमेही तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांमध्ये कोरोनाची लागण सर्वाधिक होती. दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक तरुण बाधित झाले असून त्यात मृत्यूचा आकडाही अधिक आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत सहा टक्के १४ वर्षांखालील मुले कोरोनामुळे बाधित झाली. सुदैवाने त्यात एकही बालक मृत पावलेले नाही.

    जास्त कोरोनाबाधित सापडलेल्या गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. गावे, वाड्या कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करुन निर्बंध घातले. त्या गावांमध्ये सरसकट चाचण्या करण्यास सुरवात केली. जुनच्या मध्यात सुरु केलेल्याया प्रयोगाचा परीणाम जुलैच्या मध्यात दिसू लागला आहे. मे, जुन महिन्यात दिवसाला पाचशे बाधित सापडत होते. जुलै महिन्यात ते तीनशे-साडेतीनशेच्या दरम्यान आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येऊ लागली आहे.

    - डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

    रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २९ हजार १६६ जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यातील ६८ हजार ३२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ४ लाख ६० हजार ८४३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बाधितांमधील ६२ हजार ७०२जण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचा दर ९२ टक्केपर्यंत पोचला आहे.