अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळ्यात येणाऱ्या भाविकांना समुद्र स्नानास मनाई, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

णपतीपुळेला यावेळी जवळपास 50 ते 60 हजार भाविक यावेळी दर्शन घेण्याची शक्यता आहे. पहाटे 3.30 वाजल्यापासून दर्शन सुरू होणार आहे. एकंदरीत भाविकांची संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि भाविकांची सुरक्षितता म्हणून काही निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतले आहे. यापैकी एक म्हणजे दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्र किनारी पोहोण्यास मज्जाव असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी याची माहिती दिली आहे. केवळ सुरक्षितता हाच यातील उद्देश असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

    सध्या कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना समुद्र स्नानास मनाई करण्यात आली आहे. गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणारे भाविक लगतच असलेल्या समुद्रामध्ये आंघोळ किंवा पोहण्यासाठी जात असल्या कारणाने समुद्रावर पर्यटकांची मोठी गर्दी झालेली असते. या गर्दीला टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगीतले जात आहे.

    णपतीपुळेला यावेळी जवळपास 50 ते 60 हजार भाविक यावेळी दर्शन घेण्याची शक्यता आहे. पहाटे 3.30 वाजल्यापासून दर्शन सुरू होणार आहे. एकंदरीत भाविकांची संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि भाविकांची सुरक्षितता म्हणून काही निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतले आहे. यापैकी एक म्हणजे दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्र किनारी पोहोण्यास मज्जाव असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी याची माहिती दिली आहे. केवळ सुरक्षितता हाच यातील उद्देश असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

    अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. भाविक अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने गणपतीपुळेला येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे. शिवाय, यावेळी भाविकांना कोरोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी काही भरारी पथकं देखील नेमली जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे, असंही ते म्हणाले.

    अंगारकीनिमित्त गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात स्टॉल लावण्यासाठी शहराबाहेरुनही छोटे-मोठे व्यापारी, स्टॉलधारक येत असतात. पण यंदा बाहेरुन येणाऱ्यांना स्टॉल लावण्यास मज्जाव घालण्यात आलाय. तर २ डोस घेतलेल्या स्थानिकांनाच स्टॉल लावण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.