चिपळूणमध्ये १५ वर्षाच्या एका मुलाला डबल डोस, नागरिकांमध्ये संताप

तुर्तास या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. मात्र तरीही त्याला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली. मुळात डोस देताना नोंदणी केली जाते. तसेच टोकनही दिले जातात तरीही हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

    रत्नागिरी : चिपळूणात सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड लसीचा डोस दिला जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. मात्र, तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात एका १५ वर्षीय मुलाला लसीचा डबल डोस दिल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. संबंधित मुलाला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

    दोन दिवसांपूर्वी शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी शहरातील ३८० जणांना लस देण्यात आली. मात्र आता ग्रामीण भागात लसीकरण मोहीम जोशात सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात एका १५ वार्षिय मुलाला एकाचवेळी दोन डोस दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. सकाळी १०:३० वाजता हा प्रकार घडला.

    तुर्तास या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. मात्र तरीही त्याला कामथे उप जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी दिली. मुळात डोस देताना नोंदणी केली जाते. तसेच टोकनही दिले जातात तरीही हा प्रकार घडला कसा, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

    दरम्यान, या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणे विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे.