दापोली, मंडणगड नगरपंचायतींच्या ४ जागांसाठी निवडणूक, शिवसेना विरुध्द शिवसेना लढतीची शक्यता

या निवडणूकीत शिवसेना नेते रामदास कदम समर्थक व शिवसेना नेते अनिल परब समर्थक पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब यांनी पक्षाशी गद्दारी केलीय, असा आरोप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला होता. या निवडणूकीमुळे पुन्हा एकदा अनिल परब आणि रामदास कदम गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

    रत्नागिरी : राज्यात बहुचर्चित असलेली दापोली-मंडणगड नगरपंचायत १३ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणूक झालीय. ओबीसी आरक्षणामुळे चार प्रभागातील निवडणूक स्थगित ठेवण्यात आली होती. मात्र, आता ही निवडणूक या चार प्रभागात सर्वसाधारण गटातून होणार आहे. येणाऱ्या १८ जानेवारीला या चार प्रभागातील मतदान होणार आहे.

    यासाठी दोन्ही तालुक्यातील उमेदवारांनी आपापला अर्ज सोमवारी दाखल केला आहे. दापोली आणि मंडणगड प्रत्येकी ४ जगासाठी ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ज्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत मोठया संख्येने शिवसेना बंडखोरांचा समावेश होता तसंच चित्र या निवडणुकीत देखिल पाहायला मिळत आहे.

    येत्या निवडणुकीत आणि झालेल्या निवडणुकीत बंडखोरांचा फटका शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला कितपत बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ४ जागांसाठी १८ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून या सगळ्या निवडणुकांची मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.

    या निवडणूकीत शिवसेना नेते रामदास कदम समर्थक व शिवसेना नेते अनिल परब समर्थक पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर अनिल परब यांनी पक्षाशी गद्दारी केलीय, असा आरोप माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अनिल परब आणि रामदास कदम गट असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.