fisherman

मासेमारी संदर्भातील नवीन सुधारित कायद्यातील जाचक अटी व धोरणाच्या विरोधात रत्नागिरी (Ratnagiri) येथील पर्ससीनधारक मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला ३ तारखेपासून (Fishermen Protest In Ratnagiri) सुरूवात केली आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government Rules For Fishing) मासेमारी संदर्भातील नवीन सुधारित कायद्यातील जाचक अटी व धोरणाच्या विरोधात रत्नागिरी (Ratnagiri) येथील पर्ससीनधारक मच्छीमारांनी मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला ३ तारखेपासून (Fishermen Protest In Ratnagiri) सुरूवात केली आहे. या आंदोलनामध्ये शेकडो मच्छीमार बांधव सहभागी झालेले असून सलग दहा दिवस हे उपोषण शांततेत चालू आहे.तरी यावर अद्याप तोडगा निघालेला नसून पुढील दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

    संपूर्ण जेटीवर नौका उभ्या असल्याचे पाहायला मिळते आहे.पर्ससीन नौकांवर एकतर्फी कारवाई बंद करावी. सर्व मासेमारी प्रकारांचा सखोल अभ्यास झाल्याशिवाय पर्ससीन नौकांवर कोणतीही कारवाई करू नये. सोमवंशी अहवालात पाच वर्षानंतर परत अभ्यास करावा, असे नमूद असताना सरकार परत परत सोमवंशी अहवालाचा हवाला देऊन पर्ससीन नौकांवर जाचक अटी लादत आहेत ते त्वरित बंद करावे,अशी मागणी मच्छिमारांकडून परत परत केली जात आहे.