रत्नागिरीत बापाने केली पोटच्या मुलीला बेदम मारहाण, ४ वर्षीच्या चिमुकलीचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील आरोपी ईलीयास खेडेकर हा आपल्या कुटुंबियासोबत राहतो. आरोपी ईलीयास खेडेकरला चार वर्षाची एक मुलगी आहे. आरोपी ईलीयास खेडेकर यांनी चार दिवसांपूर्वी या ४ वर्षाच्या चिमुकलीला काही किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. यावेळी मुलीला बेदम मारहाण करून तीला भिंतीवर ढकलून दिले असता तिचे डोके भिंतीवर आपटले.

    रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत ४ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    मंडणगड तालुक्यामध्ये बाणकोट गावाचा रहिवाशी असलेला आरोपी ईलियास खेडेकर यांनी स्वतःच्या ४ वर्षांच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे ही घटना घडली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने बाणकोट गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील आरोपी ईलीयास खेडेकर हा आपल्या कुटुंबियासोबत राहतो. आरोपी ईलीयास खेडेकरला चार वर्षाची एक मुलगी आहे. आरोपी ईलीयास खेडेकर यांनी चार दिवसांपूर्वी या ४ वर्षाच्या चिमुकलीला काही किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली.

    यावेळी मुलीला बेदम मारहाण करून तीला भिंतीवर ढकलून दिले असता तिचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये तीला जबर दुखापत झाली. ४ वर्षाच्या चिमुकलीला उपचारासाठी प्रथम डेरवण येथे नेण्यात आले असता गंभीर स्वरूपाचे दुखापत झाली असल्यामुळे तीला पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

    मात्र शनिवारी दिनांक १ जानेवारी शनिवारी पहाटेच्या सुमारास रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झालं आहे. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ईलियास खेडेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.