कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांना काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. आठ तासांत आरोपी जेरबंद झाला आहे (Ratnagiri: MP Vinayak Raut threatened; Accused arrested within eight hours).

    रत्नागिरी : कोकणातील शिवसेना आमदार राजन साळवी यांना काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. आठ तासांत आरोपी जेरबंद झाला आहे (Ratnagiri: MP Vinayak Raut threatened; Accused arrested within eight hours).

    आपण राणे यांचे समर्थक असल्याचे सांगून ती व्यक्ती धमकावत होती, अशी माहिती राऊत यांनी दिली. दरम्यान, धमकी देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील शिवसेना नेत्यांना धमकावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

    सिंधुदुर्गमधील नगरपंचायतीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. त्यामुळे फोन करून धमकी देणारे वाढले आहेत. याबाबत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. वाकोला पोलिसांनी या आरोपीला आठ तासांच्या आत ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली. राणे समर्थक असल्याचे सांगून आरोपी वारंवार फोनवरून धमकी देत होता, असा दावा राऊत यांनी केला आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022