घरात आढळला तीन वृध्द महिलांचा जखमी अवस्थेतील मृतदेह, दापोली पोलीस घटनास्थळी दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली. एका घरातील तीन वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळल्या. रुक्मिणी उर्फ इंदूबाई शांताराम पाटणे, पार्वती पाटणे, सत्यवती पाटणे अशी मृत वृद्धांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी रवाना झाले. अधिक तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरी येथून श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

    रत्नागिरी – दापोली तालुक्यातील वनोशी खोतवाडीत एका घरात तीन महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या तीनही महिला अतिशय वृद्ध आहेत. तिघींच्या डोक्यातून गंभीर जखम होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे मृत्यू जळून झालेले आहेत की घातपाताचा प्रकार आहे, याबाबत दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील वणौशी तर्फे नातू खोतवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली. एका घरातील तीन वृद्ध महिला जळालेल्या अवस्थेत आढळल्या. रुक्मिणी उर्फ इंदूबाई शांताराम पाटणे, पार्वती पाटणे, सत्यवती पाटणे अशी मृत वृद्धांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी रवाना झाले. अधिक तपासासाठी पोलिसांनी रत्नागिरी येथून श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

    पाटणे यांच्या घरासमोरच कुलदेवतेचे मंदिर आहे. या मंदिरात दररोरज पूजा करण्याकरीता गावातील विनायक पाटणे येतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने या महिला रोज सकाळी उन्हात बसायच्या. मात्र नेहमीप्रमाणे विनायक पाटणे कुलदैवताची पूजा करण्यासाठी आले तेव्हा या महिला बाहेर दिसल्या नाहीत. तसेच घराचे दारही आतून बंद होते. विनायक यांनी दरवाजा ठोठावला असता आतून काही प्रतिक्रिया आली नाही. त्यांनी मागच्या दरवाज्याकडे जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा उघडा होता. आत जाऊन पाहिले असता या तिघी महिला मृतावस्थेत आढळल्या. यानंतर पाटणे यांनी तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

    पार्वती व सत्यवती या दोघीही सवती असून या दोघींना मूलबाळ नसल्याने पुतण्या सांभाळ करत असल्याचे तपासात समोर आले आहे व शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो, त्याही घरी एकट्याच असल्याने या तिघी एकत्र राहत असत. मकर संक्रातीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.