Does Chief Minister Uddhav Thackeray know what Anil Parab confessed to ED? Question from BJP leader Kirit Somaiya

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिले आहे(take action on Narayan Rane's bungalow; Kirit Somaiya's challenge to Thackeray government).

    रत्नागिरी : केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिले आहे(take action on Narayan Rane’s bungalow; Kirit Somaiya’s challenge to Thackeray government).

    परिवहनमंत्री अनिल परब यांच्या बंगल्याबाबत बोलता, राणेंच्या बंगल्याबाबत का बोलत नाही? असा सवाल मला केला जातो. राज्यात सरकार कुणाचे आहे? कोस्टल झोन अॅथोरीटी पर्यावरण खात्याकडे आहे. त्याचे मंत्री आदित्य ठाकरे आहेत. मग राणेंनी काही चुकीचे केले असेल तर करा कारवाई. पुरावे असतील तर पुढे जा, असे सांगतानाच तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल सोमय्या यांनी केला.