रत्नागिरीच्या पावसमधे अंगावर होळी पडून एकाचा दुदैवी मृत्यू!

ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा येईल. घटना घडताच सलपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

    रत्नागिरी : होळीनिमित्त (Holi Festival) राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील पावसमध्ये शुक्रवारी होळीनिमित्त सुरमाडाची होळी करण्यात आली. यावेळी दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना इतकी भीषण होती की हा व्हिडीओ (Video) पाहणाऱ्याच्या अंगावरही काटा येईल. या होळी उत्सवादरम्यान अंगावर होळी पडून चंद्रकांत सलपे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा येईल. घटना घडताच सलपे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही धक्कादायक घटना व्हिडीओतून समोर आली आहे. हा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील पावस इथं शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलाय. ही राज्यभरात वाऱ्यासारखी पसरली असून याचा व्हिडीओ समोर आला आहे.