संगमेश्वरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात, तास वाहतूक ठप्प

या अपघातामुळे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातून ट्रकचालक बचावला असुन ट्रकमुळे पुलाचा कठडा तोडून ट्रकचा पुढचा भाग हवेत लोंबकळत होता. ट्रकमध्ये असलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी एक वाजल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरची (Mumbai-Goa Highway) वाहतूक पूर्ववत झाली. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, एक जण जखमी झालाय. मारुती जानू पाटील असं ट्रक चालकाचे नाव आहे.

    रत्नागिरीतील संगमेश्वर येथे बावनदी पुलावर शनिवारी सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ही घटना आहे. हा अपघात तीन ट्रक आणि कार यांच्यामध्ये झाला.

    दरम्यान या अपघातामुळे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातून ट्रकचालक बचावला असुन ट्रकमुळे पुलाचा कठडा तोडून ट्रकचा पुढचा भाग हवेत लोंबकळत होता. ट्रकमध्ये असलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

    पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी एक वाजल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरची (Mumbai-Goa Highway) वाहतूक पूर्ववत झाली. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, एक जण जखमी झालाय. मारुती जानू पाटील असं ट्रक चालकाचे नाव आहे.

    ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रकची धडक जनार्दन शेळके चालवत असलेल्या ट्रकला बसल्यामुळे पुलाच्या मध्यभागी येऊन पुलाचा कठडा या ट्रकने तोडला आहे. या ट्रकच्या अपघातात मागून येणाऱ्या कारलाही धडक बसून नुकसान झालं आहे. त्यामधील प्रवासी अर्शिया सोहेल मणेर वय २६, रा. उद्यमनगर, रत्नागिरी ही जखमी झाली आहे.