चिपळूण, महाड मधील पुरप्रश्नात केंद्रीय मंत्री नारायण राणे लक्ष घालणार

प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, वाशिष्ठी व काजळी  नदीला दरवर्षी पूर येतो या पुरामुळे अनेक समस्या उद्भभवल्या आहेत. यावर्षी या जो महापूर आला त्यामध्ये  महाड व चिपळूण ही दोन्ही शहरे उध्वस्त झाली आहेत. या दोन्ही नद्यातील गाळ लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारचे मंत्री व प्रशासन यंत्रणा फक्त हवेत आश्वासने देत आहे व कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत अत्यंत कमी कालावधी राहिला आहे.

    चिपळूण : कोकणातील चिपळूण व महाड ही दोन्ही शहरे पुरग्रस्त आहेत व येत्या पावसाळ्यात पुन्हा महापुराची टांगती तलवार आहे. यातून केंद्र सरकारने गाळ काढण्याच्या उपाययोजनांवर मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेऊन प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांना या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती आधी केली आहे. नारायण राणे यांनी प्रमोद जठार यांना आश्वासित करून केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत चिपळूण व महाडमधील काही नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत ही बैठक घेण्याचे मान्य केले आहे.

    प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, वाशिष्ठी व काजळी  नदीला दरवर्षी पूर येतो या पुरामुळे अनेक समस्या उद्भभवल्या आहेत. यावर्षी या जो महापूर आला त्यामध्ये  महाड व चिपळूण ही दोन्ही शहरे उध्वस्त झाली आहेत. या दोन्ही नद्यातील गाळ लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारचे मंत्री व प्रशासन यंत्रणा फक्त हवेत आश्वासने देत आहे व कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत अत्यंत कमी कालावधी राहिला आहे.

    जर आताच हा गाळ काढला गेला नाही तर पुन्हा एकदा महापुराचा धोका संभवतो, यासाठी केंद्र सरकारने कोकणातील या दोन्ही शहरांमसाठी दिलासा द्यावा व त्या दोन्ही नद्यातील गाळ काढण्याबाबत उपाययोजना करावी असे आवाहन त्यांनी या पत्रात केले आहे. प्रमोद जठार यांच्या विनंतीची दखल घेऊन लवकरात लवकर यासंदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांचे बरोबर बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन नारायण राणे यांनी जठार यांना दिले आहे ही बैठक पुढील काही दिवसांमध्ये आयोजित केली जाईल असे जठार यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.