मसाल्यांच्या विक्रीतून महिला बनली उद्योजक; चिपळूणच्या स्मिता विठ्ठल जाधव यांची यशोगाथा

जवळपास सहा महिने तिथे काम करत असताना त्या दररोज जेवणाच्या डब्यात स्वतःचे घरचे जेवण आणायची (Home Made Food) आणि पार्लरमधील (Parlour) तिच्या सहकाऱ्यांसोबत जेवण वाटायची. तिच्या मैत्रिणीला (पार्लर-मालक) तिचे जेवण आवडल्याने तिने खाद्यपदार्थांमध्ये वापरत असलेल्या मसाल्यांबद्दल चौकशी केली. त्यानंतर तिने स्मिता यांना ते मसाले तिच्या घरी तयार करून तिच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.

    चिपळूण : स्वतःला स्वावलंबी बनण्याची आणि कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याच्या इच्छाने रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) चिपळूण (Chiplun) येथील ४२ वर्षीय स्मिता विठ्ठल जाधव (Smita Vitthal Jadhav) यांनी चार वर्षांपूर्वी घरगुती मसाले उत्पादनाचा (Masala Products) व्यवसाय सुरू केला. अथक प्रयत्न आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्या आज एक यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे स्मिता २०२१ मध्ये महाराष्ट्रातील प्रोजेक्ट हर अँड नाऊच्या उद्योजकता सहाय्य (Entrepreneurship support of Project Her & Now) कार्यक्रमाचा एक भाग होत्या.

    स्मिताचे वयाच्या २३ व्या वर्षी पदवीचे शिक्षण घेत असताना लग्न झाले. त्यानंतर अनेक वर्षे तिने आपल्या कुटुंबाची, जवळच्या आणि प्रियजनांची काळजी घेण्यात घालवली. स्मिता यांचा मुलगा मोठा झाल्याने त्यांनी त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी बालपणीच्या मैत्रिणीच्या मालकीच्या स्थानिक ब्युटी पार्लरमध्ये काम करायला सुरुवात केली.

    जवळपास सहा महिने तिथे काम करत असताना त्या दररोज जेवणाच्या डब्यात स्वतःचे घरचे जेवण आणायची (Home Made Food) आणि पार्लरमधील (Parlour) तिच्या सहकाऱ्यांसोबत जेवण वाटायची. तिच्या मैत्रिणीला (पार्लर-मालक) तिचे जेवण आवडल्याने तिने खाद्यपदार्थांमध्ये वापरत असलेल्या मसाल्यांबद्दल चौकशी केली. त्यानंतर तिने स्मिता यांना ते मसाले तिच्या घरी तयार करून तिच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. जेव्हा स्मिता यांना जाणवले की, प्रादेशिक मसाल्यांना मागणी आहे तेव्हा अशा प्रकारे मसाले बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली.

    या क्षेत्राची व्याप्ती लक्षात आल्यानंतर २०१७ मध्ये सुरुवात झालेल्या स्मिता यांच्या गृह-आधारित एंटरप्राइझ स्मिता मसालेने खूप लांब पल्ला गाठला आहे. त्या आज कोल्हापुरी, घाटी, कोकणी, भाजका, पावडर आणि पेस्टच्या स्वरूपात लोकप्रिय महाराष्ट्रीयन मसाल्यांचे ३०+ पेक्षा जास्त प्रकार बनवत आहेत. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल त्या कऱ्हाडमधील बाजारातून घाऊक दराने खरेदी करतात आणि ‘कंडप’ मशिनने क्रश करून ती उत्पादने तयार करतात. कठोर परिश्रमाने आणि जिद्दीने स्मिता मसाले आता चिपळूणमधील सर्वात प्रसिद्ध आणि विश्वासार्ह ‘मसाला ब्रँड’ म्हणून उदयास आला आहे.

    महाविद्यालयीन प्राध्यापक असलेल्या स्मिता यांच्या पतीने त्यांना प्रेमाने “मसालों की रानी” (मसाल्यांची राणी) ही पदवी बहाल केली आहे. या प्रवासाबाबत स्मिता सांगतात की, “व्यवसाय सुरू करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात माझ्या आजूबाजूच्या काही लोकांनी माझ्यावर किंवा माझ्या एंटरप्राइझच्या उत्पादनांवर टीका करण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्याऐवजी माझ्या प्रयत्नांनी आणि कृतीने त्यांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला. आज तेच लोक माझे कौतुक करतात.