चिपळूणात बिल्डिंगवरून उडी घेत तरुणाची आत्महत्या; चिपळूणात खळबळ

या बाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार चिपळूण शहरातील पेठमाप येथे राहणारे नुरुद्दीन काझी यांचा गालिब हा अविवाहित मुलगा होता. शांत संयमी आणि घरातच राहणारा गालिब गेले काही दिवस मानसिक तणावाखाली वावरत होता. त्याच्या चुलत बहिणीचे लग्न देखील गुरुवारीच होते. त्यासाठी सर्व कुटुंब लग्नात मग्न होते. वडील नुरुद्दीन हे नवरी मुलगी बरोबर जाण्यासाठी बस मध्ये बसलेले असतानाच त्यांना घरातून तात्काळ बोलावण्यात आले तेव्हा त्यांनी धाव घेतली. परंतु तो पर्यंत गालिबची प्राणज्योत मावळली होती.

    चिपळूण : नातेवाईकाच्या लग्नाची धामधूम सुरू असताना आणि सर्व कुटुंब त्या लग्नात मग्न असताना गालिब नुरुद्दीन काझी (३५) या तरुणाने बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली. अचानक घडलेल्या या घटनेने चिपळूण शहरातील पेठमाप परिसरात एकच खळबळ उडाली तर लग्नाचा अक्षरशः बेरंग झाला. आत्महत्येचे कारण समोर आले नसले तरी तो काही दिवस नैराश्येत होता अशी चर्चा आहे.

    या बाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार चिपळूण शहरातील पेठमाप येथे राहणारे नुरुद्दीन काझी यांचा गालिब हा अविवाहित मुलगा होता. शांत संयमी आणि घरातच राहणारा गालिब गेले काही दिवस मानसिक तणावाखाली वावरत होता. त्याच्या चुलत बहिणीचे लग्न देखील गुरुवारीच होते. त्यासाठी सर्व कुटुंब लग्नात मग्न होते. वडील नुरुद्दीन हे नवरी मुलगी बरोबर जाण्यासाठी बस मध्ये बसलेले असतानाच त्यांना घरातून तात्काळ बोलावण्यात आले तेव्हा त्यांनी धाव घेतली. परंतु तो पर्यंत गालिबची प्राणज्योत मावळली होती.

    घटनास्थळावरून मिलेल्या माहिती नुसार गालिब हा पेठमाप येथील एका बिल्डिंगमध्ये राहत होता. तो लग्नाला देखील जाणार होता. दुचाकी घेऊन मी येतो तुम्ही पुढे व्हा असे वडिलांना त्याने सांगितले होते. सर्वजण लग्नाच्या गडबडीत असताना सकाळी ७.३० च्या दरम्यान तो थेट वशिष्ठ दर्शन या बिल्डींगवर गेला आणि थेट खाली उडी घेतली. त्यामुळे तो प्रचंड जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला व जागीच गतप्राण झाला. प्रथमदर्शनी हा घातपात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत होता मात्र नंतर त्याने थेट उडी घेतली हे स्पष्ट झाले.