सिंधुदुर्ग-वझरे गावात १५ हिवतापाचे रुग्ण आढळले ; १०५ जणांचे नमुने पूर्ण : वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर

वझरे गावात एका कंपनीचे बांधकाम सुरु असून अन्य राज्यातून कामगार आले आहेत. त्यात सुरुवातीला ६ हिवतापाचे रुग्ण आढळले. त्यानंतर पूर्ण कर्मचारी यांचे १०५ जणांचे नमुने घेतले असल्यास आतापर्यंत १५ जण हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वावर उपचार सुरू असून ६ जणांची प्रकृती चांगली आहे.

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) दोडामार्ग तालुक्यातील वझरे गावात (Dodamarg Taluka Vazhare Village) १५ हिवतापाचे (Paludism) रुग्ण आढळले असून आतापर्यंत १०५ जणांचे नमुने पुर्ण झाले आहेत अशी माहिती दोडामार्ग वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी दिली आहे.

    वझरे गावात एका कंपनीचे बांधकाम सुरु असून अन्य राज्यातून कामगार आले आहेत. त्यात सुरुवातीला ६ हिवतापाचे रुग्ण आढळले. त्यानंतर पूर्ण कर्मचारी यांचे १०५ जणांचे नमुने घेतले असल्यास आतापर्यंत १५ जण हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वावर उपचार सुरू असून ६ जणांची प्रकृती चांगली आहे. त्या व्यवस्थापक यांना आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या असून आरोग्य विभाग लक्ष ठेऊन आहेत. अशी माहिती दोडामार्ग आरोग्य अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी दिली आहे.