
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील वॉटर प्युरिफायर घोटाळा, राजस्थान अभ्यास दौरा घोटाळा, स्वनिधी अनियमितता घोटाळा, एलईडी टीव्ही घोटाळा, प्लास्टिक मोल्डींग लॉकर्स आणि शाळा अद्यावत प्रयोगशाळा अनियमितता आदींबाबत शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी आवाज उठविला आहे.
सिंधुदुर्ग : शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी आज जिल्हा परिषद मधील विविध घोटाळ्याबाबत आवाज उठविला. जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर जमत या सदस्यांना घोटाळे बाज जिल्हा परिषदेचा निषेध असो. घोटाळ्याची चौकशी झालीच पहिजेचा घोषणा दिल्या. भगवी टोपी परिधान करून आणि या सदस्यांनी निषेध फलक बॅनर परिधान करून जिल्हा परिसर सभागृहात प्रवेश करून आपला निषेध व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मधील वॉटर प्युरिफायर घोटाळा, राजस्थान अभ्यास दौरा घोटाळा, स्वनिधी अनियमितता घोटाळा, एलईडी टीव्ही घोटाळा, प्लास्टिक मोल्डींग लॉकर्स आणि शाळा अद्यावत प्रयोगशाळा अनियमितता आदींबाबत शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी आवाज उठविला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या टर्म मधील जिल्हा परिषद सदस्यांची आज शेवटची खास सर्वसाधणार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आज सर्व शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी सर्व शिवसेना सदस्यांनी विविध घोटाळ्यांचा उल्लेख असलेले बॅनर परिधान केले होते. यावेळी घोटाळेबाज जिल्हा परिषदेचा निषेध असो… भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी आदी घोषणा देत जिल्हा परिषद मध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद एन्ट्री पॉइंट येथेही घोषणा देत जिल्हा परिषद सभागृहात प्रवेश करत सभेला उपस्थिती दर्शविली.