nitesh rane

संतोष परब हल्लाप्रकरणात भाजपा आमदार नीतेश राणे यांना दिलासा मिळू शकला नाही. तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर वेळ संपल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारवर सुनावणी ढकलली. त्यामुळे नीतेश राणे यांना जेल की बेल याचा फैसला बुधवारी होणार आहे(Jail or bail for Nitesh Rane? Sindhudurg District Sessions Court will decide on bail).

  सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणात भाजपा आमदार नीतेश राणे यांना दिलासा मिळू शकला नाही. तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर वेळ संपल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारवर सुनावणी ढकलली. त्यामुळे नीतेश राणे यांना जेल की बेल याचा फैसला बुधवारी होणार आहे(Jail or bail for Nitesh Rane? Sindhudurg District Sessions Court will decide on bail).

  परब यांच्यावरील हल्ल्यानंतर अटकेची टांगती तलवार असल्याने नीतेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या समोर ही सुनावणी झाली.

  समोरासमोर बसवून काय साध्य करायचे आहे?

  नीतेश यांच्यावतीने अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. तर, सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. तब्बल साडेतीन तास कोर्टाने युक्तिवाद ऐकून घेतला. यावेळी कोर्टाची कामकाजाची वेळ संपल्याने राणेंच्या वकिलाने कोर्टाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. काही वेळ राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. नीतेश आणि सचिन सातपुते यांचे संभाषण पोलिसांनी हस्तगत केले आहे. सीडीआर प्राप्त झाला आहे, मग अजून काय हस्तगत करायचे आहे. सगळे सापडलेले असताना आता आरोपींना समोरासमोर बसवून पोलिसांना काय साध्य करायच आहे? असा सवाल देसाई यांनी यावेळी केला.

  मी काय मूर्ख आहे का?

  अटकेच्या भीतीने नीतेश गायब झाले आहे. ते नेमके कुठे आहे, याचा शोध सर्वत्र घेतला जात आहे. याबाबत माध्यमांनी नीतेश यांचे वडील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारले असता, ते चांगलेच संतापले. नीतेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. राज्याचे अतिरिक्त पोलिस संचालक येथे कशासाठी आले, दहशतवादी आलेत का येथे, असे काय घडले? सर्वीकडे मारहाणीसारख्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतात. घटनेसोबत आमदाराचा काही संबंध नाही, आमदार मारायला होता का, तुम्ही नावे गोवायचे आणि निवडणुकीपर्यंत गोवण्यासाठी 307 लावायचे. खरचटल्यावर 307 लागते हे पहिल्यांदाच पाहिले. मृत्यू होतो तेव्हा 307 कलम लावतात, असे राणे म्हणाले.