आंगणेवाडीची जत्रा ६ मार्चला, मात्र सर्वसामान्यांना प्रवेश नाही, यात्रा केवळ परिवारापुरतीच…

आपण ज्या ठिकाणी असाल, तिथूनच भराडी मातेला नमस्कार करावा आणि आपलं मागणंही घरातूनच मागावं, अशी विनंती आंगणे कुटुंबियांनी भाविकांना केलीय. आंगणे कुटुंबियांनादेखील गर्दी न करता, कोरोना संबंधित सर्व अटी आणि नियमांचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्यात.

राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची यात्रा यंदा ६ मार्चला होणार आहे. आंगणेवाडीतील श्री देव भराडीमातेचा वार्षिकोत्सव शनिवार, ६ मार्च २०२१ रोजी पार पडणार आहे. मात्र यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असून अनेक नियम आणि अटींसह ही यात्रा पार पडणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या यात्रेला केवळ आंगणे कुटुंबीयच उपस्थित राहू शकतील, असा नियम करण्यात आलाय. भाविकांच्या गैरसोयीबद्दल आंगणे कुटुंबीयांनी दिलगिरी व्यक्त करत कोरोना संकटामुळे येत असलेल्या मर्यादा समजून घेण्याची विनंती केलीय.