सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पाहुण्यांनी फुलले समुद्र किनारे

आधिच कोकणचे किनारे सुंदर, स्वच्छ आहेत. त्यातच सीगल पक्षाने त्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्य़ात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. पण यावर्षी नैसर्गिक वातावरणाच्या बदलत्या हवामानामुळे हे पक्षी उशीरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर दाखल झालेले पहायला मिळतात.

    सिंधुदुर्ग : तळकोकणात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी थंडीच्या दिवसात दाखल होतात. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सागरकिनारे परदेशी पाहुण्यानी फुलले आहेत. सिगल नावाचे हे पक्षी साधारणतः अमेरिका, युरोप, लडाख मध्ये पहायला मिळतात. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी तीन महीने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात. इथले उबदार वातावरण आणि खाद्य मासे या हंगामात कोकण किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात मिळत असते. त्यामुळेच हे पक्षी कोकण किनार पट्टीचा आसरा घेतात.

    पांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे, असं मोहक रूप असलेल्या या पक्ष्यांच्या प्रेमात कुणी पडलं नाही, तरच नवल! ‘सीगल’ पक्षी पाहण्यासाठी, त्यांना आपल्या कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी दरवर्षी लोकांची भरपूर गर्दी असते. मात्र, कोरोनामुळे यंदा ही गर्दी दिसणार नाहीय.