Cheap petrol splendor Naik fell expensive; The crime was filed by the police

शिवसेनेच्या वर्धापनदिनी सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांना स्वस्त दरात पेट्रोल वाटप करणे चांगलेच महागात पडले आहे. या उपक्रमादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आमदार नाईक यांच्यासह दोन्ही पक्षातील जवळपास 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या वर्धापनदिनी सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांना स्वस्त दरात पेट्रोल वाटप करणे चांगलेच महागात पडले आहे. या उपक्रमादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडाप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आमदार नाईक यांच्यासह दोन्ही पक्षातील जवळपास 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

    शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर स्वस्त दरात पेट्रोलचे वाटप करीत होते. या पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. दरम्यान, भाजपाचे कार्येकर्ते तेथे आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या आक्षेपाचे रूपांतर वादात झाले.

    दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेतला. मात्र पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीच उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिसांनी आमदार नाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे.

    हे सुद्धा वाचा