मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवेला लवकरच सुरुवात, 9 ऑक्टोबरला होणार पहिलं ‘टेक ऑफ’, करा फक्त 2520 रुपयांत प्रवास

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या चिपी विमानतळाला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ टेक ऑफसाठी सज्ज झालं आहे. चिपी विमानतळ येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून, पहिलं विमान हे मुंबई ते सिंधुदुर्ग असे झेपावणार आहे.

    जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरुन येत्या 9 ऑक्टोबरपासून नियमित मुंबई ते सिंधुदुर्ग असा विमान प्रवास सुरु होणार आहे. मागील अनेक दिवस या विमानसेवेच्या श्रेयवादावरुन वाद सुरु होते. अगदी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा या विमानतळाच्या उद्घाटनावरुन ठाकरे सरकारवर टीका केली होती. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या चिपी विमानतळाला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ टेक ऑफसाठी सज्ज झालं आहे. चिपी विमानतळ येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून, पहिलं विमान हे मुंबई ते सिंधुदुर्ग असे झेपावणार आहे.

    नागरी उड्डाण महासंचालनालयानं मागील आठवड्यात चिपी विमानतळावरून विमान प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी अलायन्स एअरला एअरोड्रोम लायसन्स दिलं आहे. अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी नियमित विमान सेवा चालवणार आहे. ही कंपनी चिपी विमानतळावर विमान चालवणारी पहिली देशांतर्गत एअरलाईन्स असेल. केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्ही स्कीम अंतर्गत ही सेवा सुरु राहणार आहे. वेळापत्रकानुसार, भूजहून येणारे ‘9आय 661’ क्रमांकाचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक-ऑफ घेईल. हे विमान चिपी विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल. विमानाचा (9आय 661) सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.

    मुंबईतील चाकरमान्यांना गणपती किंवा शिमग्याच्या सणांना गावी जाताना तिकीटं मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. ब-याचदा सणांच्या वेळी लक्झरींच्या तिकीटांच्या किंमतीतही वाढ केली जाते. पण, आता मात्र 2500 रुपयांत चाकरमान्यांना मुंबईतून कोकणात विमान प्रवास करता येणार आहे. रस्ते किंवा रेल्वे मार्गाने प्रवासात बराच वेळ खर्च करावा लागतो. परंतु विमानाने हाच प्रवास अत्यल्प वेळात आणि सुकर होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असल्याचे बोलले जात आहे.