कुडाळमध्ये नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १४ जण रिंगणात

कुडाळ नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडली. ही निवडणूक एकूण १७ पैकी १३ प्रभागांसाठी घेण्यात आली. आता उर्वरीत ४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या ४ प्रभागांची निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलली होती. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यातील प्रभाग क्रमांक ३ लक्ष्मीवाडी, प्रभाग क्रमांक १० केळबाईवाडी येथे महिला तर, प्रभाग क्रमांक १६ एमआयडीसी आणि प्रभाग क्रमांक १७ सांगिरडेवाडी येथे सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालं आहे.

    सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित ४ जागांच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून यामध्ये सेना-राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, मनसे, अपक्ष यांचा समावेश आहे.

    कुडाळ नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडली. ही निवडणूक एकूण १७ पैकी १३ प्रभागांसाठी घेण्यात आली. आता उर्वरीत ४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या ४ प्रभागांची निवडणूक प्रक्रिया ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलली होती.

    या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यातील प्रभाग क्रमांक ३ लक्ष्मीवाडी, प्रभाग क्रमांक १० केळबाईवाडी येथे महिला तर, प्रभाग क्रमांक १६ एमआयडीसी आणि प्रभाग क्रमांक १७ सांगिरडेवाडी येथे सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालं आहे.

    सोमवारी दुपारी साडेबारानंतर नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांकडून गर्दी करण्यात आली होती. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांच्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

    संध्याकाळी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, प्रभाग ३ मध्ये शिवसेनेकडून अश्विनी पाटील, भाजपकडून चांदणी कांबळी, अपक्ष नेत्रा नेमळेकर रिंगणात असतील.   तर प्रभाग १० मध्ये शिवसेनेकडून प्रांजल कुडाळकर, भाजपकडून रिना पडते आणि काँग्रेसकडून अक्षता खटावकर स्पर्धेत असतील. प्रभाग १६ मध्ये शिवसेना किरण शिंदे, भाजप सुधीर चव्हाण आणि मनसेचे सहदेव उर्फ बाळा पावसकर यांच्यात लढत होईल. प्रभाग १७ मध्ये शिवसेनेकडून अमित राणे, भाजपकडून रामचंद्र परब आणि मुक्ती परब, राष्ट्रवादी सुनील भोगटे आणि काँग्रेसकडून ऋषिकेश कांबळी रिंगणात आहेत.