Chipi airport inauguration | 'कोकणचे कोंबडी वडे देखील प्रसिध्द आहेत' - मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट2 महीने पहले

‘कोकणचे कोंबडी वडे देखील प्रसिध्द आहेत’ – मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

ऑटो अपडेट
द्वारा- Navarashtra News Network
द्वारा- Kaustubh Khatu
14:38 PMOct 09, 2021

कुणी काय करावं हा ज्याचात्याचा विषय आहे. मी त्याविषयावर नंतर बोलेलही कदाटचित. पण आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचं वैभव आहे ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याचा विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत. एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निओ करु असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्निओला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. बाकीचे गोष्ट आदित्यने सांगितले आहेत. पांठतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल.

14:36 PMOct 09, 2021

तुम्हाला लघू का होईना, सूक्ष्म का होईना पण केंदीय मंत्रीपद मिळालं आहे, त्यातून विकास करा. संधी मिळणे महत्त्वाचे आहे. संधी मिळाली आहे, त्याची माती करायची की सोनं करायचं हे ठरवा. 

14:27 PMOct 09, 2021

किल्ल्यांमध्ये मला वाटतं की सिंधुदुर्ग तरी शिवाजी महाराजांनी बांधलाय, नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधलाय. कोकणसाठी तुम्ही केलं यासाठी तुमचे अभिनंदन, नारायणराव. कोकणचा माणूस शांत, संयमी आहे, पण दहशतीला भिवून तो काही करणार नाही.

14:25 PMOct 09, 2021

माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेना आणि कोकण हे नातं मी सांगायला नको. मी स्वत: अनेकदा म्हटलो आहे. कोकणवासीयांसमोर शिवसेना प्रमुख नतमस्तक झाले.

14:23 PMOct 09, 2021

कुणी काय केलं, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, बोलायचं असेल तर मलाही खूप बोलता येईल. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन बोलणं वेगळं आणि तळमळीनं बोलणं वेगळ, त्यावर मी नंतर बोलेन. आपण एकत्र मिळून विकास करुयात. 

14:21 PMOct 09, 2021

मातीची दुख मातीला माहिती. मातीत काही बाभळीची झाड़ही उगवतात. त्याला माती काय करणार? मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंना टोला

14:19 PMOct 09, 2021

आजचा दिवस आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा - उध्दव ठाकरे

14:17 PMOct 09, 2021

माझा महाराष्ट्राशी फक्त राजकीय संबंध नाही. माझं एक पारंपरिक आणि रक्ताचं संबंध आहे. माझं सिंधुदुर्गासोबतही संबंध आहे. सिंधुदुर्गाचा विशाल इतिहास आणि आमचे छत्रपती शिवाजी महारांचा इतिहास मोठा आहे. हा जिल्हा शौर्याचा प्रतिक आहे. मी 500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं स्मरण करतो. पण छत्रपतींचा हिंदवी स्वराज्याचा विचार होता. एकीकडे पेशवे तर दुसरीकडे त्यांचे तीन प्रमुख सेनापती होते. शिंदे, होळकर आणि गायकवाड यांना एकत्र घेऊन शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज आणि इंग्रजांना हरवलं होतं. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हा आमच्या मराठ्यांचा गौरव क्षण आहे. आमची सिंधुदुर्गाची ही एक केसरीया धरती आहे. हे फक्त विमानतळाचं उद्घाटन नाही. आता नव्या अध्यायाला सुरुवात झाली. हे तीन दशकांचं संकट होतं. बाळासाहेब थोरात आणि नारायण राणे यांनीही सांगितलं माझ्या वडिलांचं विमानतळाचं एक स्वप्न होतं. त्यांनी रेल्वे मंत्री असतानाही कोकणात रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद आणि अभिनंदन करतो.

14:08 PMOct 09, 2021

मी नावं घेतलं तर राजकारण होईल, आज हायवे, झालेत. राज्यात कुठे झालं नसेल ते रस्ते अडवण्यात आलं. आमचं भागवा आणि रस्ते चालू करा असं म्हटलं गेलं. अजित पवारांनी आज नाव घेतलं. जमिनी हस्तांतरणासाठी १०० कोटी दिले. त्यावेळी आंदोलन करणारे आज स्टेजवर आहेत. तेव्हा जे होतं ते आज नाही. परिस्थिती बदलतेय. तुम्ही आलात मला आनंद वाटला. सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत, त्यांनी अभ्यास करावा, ४८१ पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा, निसर्ग कसा ठेवावा, भात आणि घरावरील कौलं कशी ठेवावी हे वाचा. धरणाची कामं पुढे जात नाहीत, माझ्यावेळी जेवढी झाली त्याच्या पुढे कामंच नाहीत.

14:01 PMOct 09, 2021

म्हैसकराऐवजी दुसरा मालक झाला हे मला माहित नाही. स्टेजवर आल्यावर विनायक राऊतांनी माईक हातात घेतला, कार्यक्रम कुणाचा हेच कळेना, प्रोटकॉलचं काय? इथले लोकप्रतिनिधी काय करतात, याकडे लक्ष द्या, एक माणूस ठेवा. आदित्य ठाकरे माझ्यासाठी टॅक्स फ्री, त्यांना मी काही बोलत नाही. त्यांनी या परिसराचा विकास करावा.

Load More

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत. तब्बल 16 वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहयाला मिळाले. मात्र यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इतकंच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
०४ शनिवार
शनिवार, डिसेंबर ०४, २०२१

मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढल्याने मुंबईतील समस्या वेगाने सोडविण्यास मदत होईल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.