सुडाचं राजकारण करून राज्य पुढे जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे

    सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नितीन राणे यांच्यामागे आज सकाळपासून कारवाईचा ससेमिरा लागला आहे. सिंधुदुर्गातील निलरत्न बंगल्याबाबत केंद्राने झोन प्राधिकरणाला राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण – चिवला बीचवरील नीलरत्न या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर मुंबईतील जूहू येथील अधीश या बंगल्यावरही आज बीएमसीकडून कारवाईसाठी पथक पाठवण्यात आले. यावर नितेश राणे यांनी टिका केली असून सुडाचं राजकारण करून राज्य पुढे जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे असे म्हटले आहे.

    मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत नितेश राणे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ आहे. मात्र जनतेला भेटायला, त्यांचे  प्रश्न सोडवायला वेळ नाही. मुठी दाखवून आव आणायचा आणि घरी जाऊन बेडवर झोपायचं, याचा काही उपयोग नाही. प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं चित्र आम्हाला सुद्धा पाहायचा आहे. सुडाचं राजकारण करून राज्य पुढे जाणार नाही, मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत.” तेलंगणाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील आले होते त्यात एवढं विशेष काय. असेही ते म्हणाले.

    तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्याबद्दल बोलताना नितेश राणे म्हणाले की, नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. असे किती ऐरे गैरे आले तर आम्हाला काही फरक पडणार नाही.