राणे म्हणतात चिपी विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या, उद्धव ठाकरे म्हणतात…

चिपी विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं, याची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि थोर समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यापैकी एकाचं नाव देण्यात यावं, अशी चर्चा आहे. त्यातच भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी या विमानतळाला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव देण्यात यावं अशी मागणी केलीय.

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ हा कोकणवासियांसाठीचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प. या विमानतळाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असताना त्यावरून राजकारण मात्र जोरदार रंगताना दिसतंय.

चिपी विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं, याची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि थोर समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै यापैकी एकाचं नाव देण्यात यावं, अशी चर्चा आहे. त्यातच भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी या विमानतळाला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव देण्यात यावं अशी मागणी केलीय.

चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याच्या प्रस्तावामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलंय. नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरेंचं कडवट शिवसैनिक असणं चिपी विमानतळ हा नारायण राणेंचा ड्रीम प्रोजेक्ट असणं ही ती दोन कारणं. शिवाय नारायण राणेंची इच्छा हेदेखील एक कारण असल्याचं त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट होतंय.

दरम्यान, अगोदर विमानतळ सुरू करा, मग नाव द्या, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीय. विमानतळाला नाव देण्याचे अधिकार केंद्र सरकारने राज्याला दिलेले आहेत. २६ जानेवारी २०२१ पर्यंत हे विमानतळ सुरू करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आले आहेत. तर हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीचं असल्यामुळं कोकणवासियांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय.