Vaibhav Naik criticizes Narayan Rane

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपाचे आमदार नीतेश राणे अजूनही बेपत्ता आहे. जामिनासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. पण, त्यांना त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच लपवून ठेवले आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे(Rane hid Nitesh at home; Serious allegations of Shiv Sena MLA Vaibhav Naik).

    मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपाचे आमदार नीतेश राणे अजूनही बेपत्ता आहे. जामिनासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली आहे. पण, त्यांना त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीच लपवून ठेवले आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे(Rane hid Nitesh at home; Serious allegations of Shiv Sena MLA Vaibhav Naik).

    नीतेश यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागला नाही. नीतेश यांनी आता हजर व्हावे. ते कुठे आहेत हे त्यांच्या कुटुंबीयांना माहीत आहे. त्यांचे दररोज बोलनेही होत आहे, असे नाईक म्हणाले.

    वडील केंद्रीय मंत्री असल्यामुळे आरोपीला लपण्यासाठी मदत होत आहे. नारायण राणे यांनीच नीतेश यांना लपवून ठेवले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही ईश्वर चिठ्ठीतून जिंकली आहे. बँक त्यांच्या हातात होती पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. या निवडणुकीत पैशाचा वापर मोठा झाला होता असा आरोपही नाईक यांनी केला.

    हे सुद्धा वाचा
    • 2022