कुडाळमध्ये राणे पीता पुत्रांना धक्का, सत्ता जाण्याची शक्यता; शिवसेना काँग्रेसला सोबत घेत सत्तास्थापनेच्या तयारीत

सिंधुदुर्गात शिवसेनेने नारायण राणे यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. वैभववाडी नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता. त्याठिकाणी यंदा शिवसेनेचे ५ तर शिवसेना पुरस्कृत दोन उमेदवारांचा विजय झाला आहे. देवगड नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा एक नगरसेवक होत्या. त्याठिकाणीही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून ९ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे देवगड नगरपंचायतीवर आमची सत्ता येईल. तर कुडाळ नगरपंचायतीमध्ये यापूर्वी शिवसेनेचे ५ नगरसेवक होते. आता आमचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. याठिकाणी काँग्रेसने सहकार्य केल्यास आमची सत्ता येईल, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

    सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला आहे. अशा प्रकारे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकूण ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्वाधिक जागा असल्याने या ठिकाणी शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

    नगरपंचायत निवडणुकमध्ये वैभववाडीत भाजपाला ९, शिवसेनेला ५, अपक्षांना ३ जागा मिळाल्या आहेत. निलेश राणें यांनी हा गड जिंकला आहे. कुडाळमध्ये मात्र नारायण राणेंना धक्का बसणार का ? की सत्ताधारी बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजपला ८, सेनेला ७ तर काँग्रेसला २ जागा याठिकाणी मिळाली आहे. काहीशा प्रमाणात त्रिशंकु परिस्थिती पहायला मिळत आहेत. दरम्यान दोडामार्गाची निकाल प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे.