Rane father-son blow to Shiv Sena; Unopposed election of 28 members in Sindhudurg

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपाने बाजी मारली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर 11 जागा जिंकत भाजपाने सत्ता मिळवली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला(Rane's dominance over Sindhudurg District Bank! BJP's undisputed power; Defeat of Mahavikas Aghadi).

  सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपाने बाजी मारली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर 11 जागा जिंकत भाजपाने सत्ता मिळवली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला(Rane’s dominance over Sindhudurg District Bank! BJP’s undisputed power; Defeat of Mahavikas Aghadi).

  निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला.

  राज्यभर गाजली प्रतिष्ठेची लढाई

  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपच्या विजयानंतर पराभूत उमेदवार मावळते अध्यक्ष सतीश सावंत यानी हा भाजपच्या धनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या दिग्गजांनी वर्चस्व पणाला लावत प्रतिष्ठेची लढाई केल्याने ती राज्यभर गाजली. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. त्यातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांयकाळी सिंधुदूर्ग गाठलेत्यावेळी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

  जनतेचा आशीर्वाद

  भाजपाची सत्ता आली आहे, माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नीतेश राणेने घेतलेली मेहनत, त्याला नीलेश आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला. अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

  नीतेश राणेंची फेसबुक पोस्ट

  या निकालानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणे यांनी फेसबुकवर पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली. नीतेश यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर निशाणा साधला. कणकवलीतून लढत असलेल्या सतीश सावंत यांचा पराभव झाला. त्यांना उद्देशून नीतेश यांनी ‘गाडलाच’ असे लिहीत एक फोटो टाकला. या फोटोमध्ये नीतेश हे सतीश सावंत यांच्या अंगावर उभे राहिलेले दिसत आहे.

  आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे लक्ष

  जिल्हा बँक निवडणुकीतील विजय हा माझा नव्हे तर भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवी-देवता आणि जनतेचा आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे आमचे लक्ष आहे. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही अशी टीका राणेंनी केली.

  सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सर्व भाजप नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन.

  - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
  हे सुद्धा वाचा