May God save Konkan from such fools Nitesh Rane criticizes Vinayak Raut

संतोष परब हल्ला प्रकरणात गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना गुरुवारी दोन जबर धक्के बसले. पहिला धक्का त्यांना सहकार विभागाने सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क नाकारल्याने तर दुसरा धक्का त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने बसला(Sindhudurg District Sessions Court rejects pre-arrest bail of BJP MLA Nitesh Rane, who has been missing for four days in Santosh Parab attack case).

  सिंधुदुर्ग: संतोष परब हल्ला प्रकरणात गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना गुरुवारी दोन जबर धक्के बसले. पहिला धक्का त्यांना सहकार विभागाने सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क नाकारल्याने तर दुसरा धक्का त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने बसला(Sindhudurg District Sessions Court rejects pre-arrest bail of BJP MLA Nitesh Rane, who has been missing for four days in Santosh Parab attack case).

  मागील दोन दिवसांपासून कोर्टात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन नाकारला. दरम्यान, द्या उच्च न्यायालयात नितेश राणेंचे वकील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहेत.

  राणेंचे व सरकारी वकिलांमध्ये खडाजंगी

  राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली. राणे यांनी शिवसैनिक परब यांच्या हत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. मागील चार दिवसांपासून राणे हे अज्ञातवासात असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. राणे यांना प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा त्यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी कोर्टात केला. परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि राणे यांचा काहीही संबंध नसल्याचेही अॅड. देसाई यांनी सांगितले. तर, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. राणे हे पोलिस तपासात सहकार्य करत नसल्याचे घरत यांनी सांगितले. सरकारी वकील आणि राणेंचे वकील यांच्यात खडाजंगी झाली.

  नारायण राणेंनाही बजावली होती नोटीस

  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी बुधवारी नोटीस पाठवली होती. कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून आमदार राणे यांच्याबाबतची माहिती देण्याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली होती.या नोटीशीवरून भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली.