Nilesh Rane's venomous criticism after Uddhav Thackeray's talk of becoming Prime Minister

मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काही उपयोग नाही. चाळीस दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत. निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासामध्ये तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल.' अशी टीका राणे यांनी केली आहे.

  सिंधुदुर्ग : सिंधुर्गाच्या चार नगरपंचायतींसाठी आज मतदान होत असून या निवडणुकीत राणे कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
  निलेश राणे म्हणाले की, ‘या चारही नगरपंचायती मध्ये मोठ्या मताधिक्याने आमचे सर्व नगरसेवक जिंकतील आमच्या चारही नगरपंचायती मोठ्या फरकाने निवडून येतील याची मला खात्री आहे. विरोधकांनी किती भानगडी लावायचा प्रयत्न केला तरी त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही.’
  ‘त्यांची जेवढी उंची तेवढी त्यांची अक्कल म्हणून ते फक्त भानगडी लावायचा प्रयत्न गेली दोन दिवसापासून करत आहेत. पण आमचे कार्यकर्ते जनतेला त्रास होऊ नये निवडणूक ही शांतते मध्ये पार पडावी यासाठी शांत राहून जनतेमध्ये राहून काम करत आहेत.’
  ‘आम्हाला विकास हवा हे भांडण नको. पण, शिवसेना असेल किंवा विरोधक त्यांना मात्र विकास नको भानगड हवी आहे. आज फरक आहे.’ असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
  तर, सर्व जागांवर महाविकास आघाडीचा विजय असेल आमदार वैभव नाईक यांच्या या दाव्यावर बोलताना राणे म्हणाले की, ‘त्यांना ते बोलावं लागतं. या चार पैकी एकही नगरपंचायत त्यांची नाही. म्हणून त्यांना तसं बोलावं लागतं अशा बोगस आमदाराने विजयाची वार्ता करू नये. रिझल्टच्या दिवशी चारही नगरपंचायती भारतीय जनता पक्षाच्या असतील.’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  मुख्यमंत्री काही कामाचे नाहीत
  मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आम्ही डायरेक्त निधी आणू आमदार वैभव नाईक यांच्या या दाव्यावर बोलताना राणे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री शिवसेनेचे जरी असले तरी महाराष्ट्राला त्यांचा काही उपयोग नाही. चाळीस दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत. निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून जर कोणाची नोंद इतिहासामध्ये तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची होईल.’ अशी टीका राणे यांनी केली आहे.