Vaibhav Naik criticizes Narayan Rane

जिल्ह्यात सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका सुरू नाहीत. मात्र जिल्ह्यातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभांचा सपाटा लावत विरोधकांवर टीकेची झोड उडविली आहे तर तर स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतले आहे. गद्दारी केलात तर मी सहन करणार नाही असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. राणेंच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून गद्दारी करणाऱ्यानी गद्दारी करू नये असा खोचक टोमणा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी हाणला(Vaibhav Naik criticizes Narayan Rane).

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका सुरू नाहीत. मात्र जिल्ह्यातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सभांचा सपाटा लावत विरोधकांवर टीकेची झोड उडविली आहे तर तर स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतले आहे. गद्दारी केलात तर मी सहन करणार नाही असा इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. राणेंच्या या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून गद्दारी करणाऱ्यानी गद्दारी करू नये असा खोचक टोमणा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी हाणला(Vaibhav Naik criticizes Narayan Rane).

    गद्दारी केलात तर मी सहन करणार नाही. माझ्याकडे गद्दारी चालत नाही. पद मागा मी देईन पण गद्दारी सहन करणार नाही. गद्दारी करून आपल्याच लोकांना पाडणार असाल तर चालणार नाही असे राणे म्हणाले.

    गद्दारीतून जन्म झालेल्या राणेंनी गद्दारी बद्दल बोलू नये, मुलांसाठी भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना राणे धमक्या देतात मात्र कार्यकर्त्यांनी घाबरू नये. राणेंनी शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले असा घणाघात वैभव नाईक यांनी केला.